Top
Parle Tilak Vidyalaya Road, Vile Parle (East) Mumbai - 400057

Ramabai Paranjape Balmandir

Our History / शाळेचा इतिहास

Vile Parle was one of the suburbs of Bombay province during the pre-independence period, in the year 1937. It was a small community back then. People from many cultures and communities coexisted and lived in peace. There was a lack of knowledge about pre-primary education. The education of small children aged 3 to 5 years was not given significant weight. A famous social worker from Bombay province, Smt Shantabai Kashalkar, paid a visit to Shri G.K.Chitale and his wife, Smt Sharadabai Chitale, and stayed at their home. Smt Kashalkar recommended that they establish a balmandir in Vile Parle. As a result, the noble couple quickly consented and offered their home as a place to begin one.

Smt. Sharada Chitale discussed the idea of balmandir with her two acquaintances Smt. Radhabai Chittar and Smt.Shashikalabai Kasargod. They readily agreed and immediately started to work on it.They needed to train themselves.

Madam Montessori, the founder of early childhood education, had already begun a three-month course in Adiyar, south India. Smt. Sharada bai Chitale went to Adiyar right away to get the training. Smt. Chittar and Smt. Kasargod, followed her footsteps. Smt. Chittar received her training In “SHISHUVIHAR”at Dadar, while Smt .Kasargod educated herself at home by reading all of Madam Montessori’s literature. The Chitale family generously offered their home to help establish the balmandir. It was a difficult task for all three of them to persuade other families to send their children to the balmandir. The idea of a school for children of this age, i.e., 3 to 5 years, was novel at the time. The school initially had 8 students, with a fee of Rupee 1. The funds were not sufficient. They were running out of money. As a result, all three worked without any remuneration, they created all of the educational materials themselves. The money raised through fees was utilised to purchase classroom furniture. However, as the popularity of the school started increasing, families began to send their children to school. As a result, the requirement for a larger space grew. Obtaining finances was impossible because the balmandir was not registered. Later the balmandir was registered as BAL VIKAS KENDRA and soon it gained popularity. After receiving the registration, the Bal mandir’s administrators sought assistance from a few persons in Vile Parle.

SHRI VISHNU PARANJAPE, a philanthropist, was born in Vile parle. Bal Vikas Kendra sought assistance from Shri Vishnu Paranjape. He was quick to assist them by donating land in the name of his wife, Smt. RAMABAI PARANJAPE. Shri. Paranjape, his son Shri. Baburao Paranjape, and his brothers all volunteered their time and effort. The balmandir got its own structure by the year 1950. After a lot of hard work and selflessness, a dream was realised. The structure was inaugurated in April 1950 by none other than SMT. TARABAI MODAK, India's pioneer of early childhood education. It took 13 years of dedication to make the balmandir a success. Others, including architects Mr. Sathe, & eminent social worker Mr. Bhaskarrao Ganu, and Mr.S.N Kalbag, came forward as advisors to help build the building and manage the finances. There was no turning back once the institution was properly founded. RAMABAI PARANJAPE BALMANDIR was the name given to it. The balmandir had its own English medium section in 1983. It was very popular and in high demand. Another diamond was added to the crown in 2005. ISO certification was given to the school. Then, in 2008, the ICSE Curriculum section was established, which has since grown in popularity and is in high demand. In 2016, a branch was opened at Vijay nagar at Andheri.

The small institution grew into a large organization & will continue to do so for future generations.

१९३७ साली, स्वातंत्र्यपूर्व काळात विलेपार्ले हे मुंबई प्रांताच्या उपनगरांपैकी एक होते. तेव्हा तो एक छोटा समुदाय होता. अनेक संस्कृती आणि समुदायांचे लोक एकत्रित आनंदात राहत होते. पूर्वप्राथमिक शिक्षणाबाबत ज्ञानाचा अभाव होता. ३ ते ५ वर्षे वयोगटातील लहान मुलांच्या शिक्षणाला महत्त्व दिले जात नव्हते. मुंबई प्रांतातील प्रसिद्ध समाजसेविका श्रीमती शांताबाई कशाळकर यांनी श्री. गणेश चितळे आणि त्यांच्या पत्नी श्रीमती शारदाबाई चितळे यांच्या घरी भेट दिली व काही काळ तिथे वास्तव्य केले. श्रीमती कशाळकर यांनी विलेपार्ले येथे बालमंदिर स्थापन करावे असे सुचवले. या थोर जोडप्याने त्वरित हा प्रस्ताव मान्य करून आपल्या घरात बालमंदिर सुरु करण्यास संमती दिली.

पूर्व प्राथमिक शिक्षणाच्या संस्थापिका मॅडम मॉन्टेसरी यांनी भारतातील अडियार येथे तीन महिन्यांचा अभ्यासक्रम आधीच सुरू केला होता. श्रीमती शारदाबाई चितळे प्रशिक्षण घेण्यासाठी लगेच अडियार येथे गेल्या. श्रीमती चित्तार आणि श्रीमती कासरगोड यांना बालशिक्षणाबद्दल आस्था होती. श्रीमती चित्तार यांनी दादर येथील शिशुविहार येथे प्रशिक्षण घेतले, तर श्रीमती कासरगोड यांनी मॅडम माँटेसरीचे सर्व साहित्य वाचून स्वतःला घरीच प्रशिक्षित केले. बालमंदिराच्या स्थापनेसाठी चितळे कुटुंबाने उदार मनाने आपले घर देऊ केले. इतर कुटुंबांना आपल्या मुलांना बालमंदिरात पाठवायला लावणे हे सर्वांसाठी कठीण काम होते. या वयाच्या म्हणजे ३ ते ५ वयोगटातील मुलांसाठी शाळेची कल्पना त्याकाळी अभिनव होती.

सन १९३८ मध्ये बालमंदिरात केवळ ८ विद्यार्थ्यांसह त्यांनी शाळा सुरू केली. बालमंदिराची फी रु.१/- होती. त्यांच्याकडे पैशांची कमतरता होती. म्हणून त्यांनी सुरुवातीला विनामूल्य काम केले आणि सर्व शैक्षणिक साहित्य स्वतः तयार केले. शुल्कापोटी जमा झालेला निधी वर्गातील फर्निचर खरेदीसाठी वापरण्यात आला.
मात्र शाळेची लोकप्रियता जसजशी वाढत गेली, तसतशी कुटुंबे आपल्या मुलांना शाळेत पाठवू लागली. परिणामी, मोठ्या जागेची आवश्यकता भासू लागली. बालमंदिर नोंदणीकृत नसल्याने अर्थसहाय्य मिळणे कठीण होत गेले. लवकरच बाल विकास केंद्र या पालक संस्थेची स्थापना आणि नोंदणी करण्यात आली. त्यानंतर “बाल विकास केंद्र” संचालित, “रमाबाई परांजपे बालमंदिर” शाळेची पुढील वाटचाल यशस्वीरीत्या सुरु झाली. नोंदणी मिळाल्यानंतर बालमंदिराच्या प्रशासकांनी विलेपार्ले येथील स्थानिक लोकांना मदतीसाठी आवाहन केले.

सामाजिक कार्याची जाणीव असलेले एक दानशूर व्यक्तिमत्व श्री. विष्णू परांजपे, यांनी आपल्या पत्नी श्रीमती रमाबाई परांजपे यांच्या नावे जमीन दान करून तत्परतेने सहाय्य केले. श्री. विष्णू परांजपे, त्यांचे पुत्र श्री. बाबुराव परांजपे आणि त्यांचे बंधू या सर्वांनी आपले योगदान दिले. १९५० सालापर्यंत बालमंदिराची स्वत:ची वास्तू तयार झाली. नि:स्वार्थी आणि मेहनती कार्यकर्त्यांच्या योगदानामुळे एक स्वप्न साकार झाले.
भारतातील पूर्व प्राथमिक शिक्षणाच्या प्रणेत्या श्रीमती ताराबाई मोडक यांच्याद्वारे एप्रिल १९५० मध्ये नवीन वास्तूचे उद्घाटन झाले. बालमंदिर यशस्वी करण्यासाठी १३ वर्षे समर्पण करावे लागले. विलेपार्ल्यातील प्रसिद्ध वास्तूविशारद श्री. साठे, प्रख्यात समाजसेवक श्री. भास्करराव गानू आणि श्री. एस. एन. कलबाग यांनी इमारत बांधण्यासाठी आणि आर्थिक व्यवस्थापनासाठी सल्लागार म्हणून मोलाचे मार्गदर्शन केले. हळूहळू संस्थेचा उत्कर्ष होत गेला. १९८३ मध्ये बालमंदिराचा इंग्रजी माध्यम विभाग सुरु झाला. २००५ मध्ये शाळेला ISO प्रमाणपत्र प्राप्त झाले. त्यानंतर २००८ मध्ये ICSE अभ्यासक्रम विभाग सुरू करण्यात आला, २०१६ मध्ये अंधेरी, पूर्व येथील विजय नगर येथे बालमंदिराची शाखा सुरू करण्यात आली.

१९३८ साली लावलेल्या लहान रोपट्याचे एका मोठ्या बालशिक्षण संस्थेत रुपांतर झाले. बालशिक्षणाचा वारसा पुढील अनेक पिढ्यांपर्यंत नेण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न असाच पुढे चालू राहील.



Looking for admission of your kid?

Ramabai Paranjape Balmandir is the right place to begin your child's education.