Gallery 2022-2023
गोपाळकाला श्रावण महिन्यातील वद्य अष्टमीला श्रीकृष्णाचा जन्म झाला.देवकी व वसुदेव यांचा आठवा पुत्र म्हणजे श्री कृष्ण होय.वासुदेवाने दुष्ट कंसाच्या बंदीवासातून मुक्त करून त्याला सुखरूप आपला मित्र नंदराजा व यशोदा यांच्याकडे स्वाधीन केलेआणि कृष्णाच्या आगमनाने गोकुळात आनंदीआनंद झाला.त्यादिवसापासून सर्वत्र श्रीकृष्णजन्माष्टमी आनंदाने साजरी केली जाते .महाराष्ट्रात गोकुळाष्टमीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे नवमीला दहीहंडी साजरी करतात. श्रावण महिन्यातील वद्य अष्टमीला जन्माष्टमी व दहीहंडी साजरी केली जाते. आपल्या शाळेत देखील *गोपाळकाला * खूप छान साजरा केला जातो. सुरवातीला अमिता ताईंनी श्रीकृष्ण जन्म व दहीहंडी ह्याची थोडक्यात माहिती सांगितली.सर्व मुले छान रंगीत कपडे घालून शाळेत आली होती व सर्व मुले " संगीत गोपालकाला"ह्या कार्यक्रमात आनंदाने सहभागी झाली व शेवटी मोठ्या जल्लोषात गोविंदा आला रे आला...म्हणत दहीहंडी फोडली. गोपाळकाल्याचा कार्यक्रम बघायला शाळेच्या मुख्याध्यापिका पुर्णिमाताईं व उपमुख्याध्यापिका शामली ताई आवर्जून आल्या होत्या.दहीहंडीचा कार्यक्रम झाल्यानंतर मुलांना पोह्याचा खाऊ देण्यात आला.
Ramabai Paranjape Balmandir is the right place to begin your child's education.