Top

Gallery 2022-2023

Bhondala Celebration

भोंडला

भोंडला हा महाराष्ट्राची संस्कृती जपणारा पारंपरिक खेळ आहे.नवरात्रीमध्ये नऊ दिवस तर कोणी सोळा दिवस भोंडला खेळतात. विदर्भामध्ये "भुलाबाई " व "हादगा" म्हणून हा खेळ खेळला जातो. अश्विन महिन्याच्या हस्त नक्षत्राला भोंडल्याची सुरूवात होते.भोंडला हा सर्व मुलींचा विशेष आवडता खेळ आहे. प्रथम एका पाटावर हत्ती मधोमधमांडून त्याला फुलांच्या रांगोळीने सजवतात. त्याभोवती सर्व स्त्रिया, मुली फेर धरून भोंडल्याची पारंपारिक गाणी म्हणतात. भोंडला खेळल्यानंतर खिरापत दिली जाते. हत्ती हे समृध्दीचे प्रतिक आहे म्हणून सगळीकडे धनधान्य भरपूर पिकावे ह्यासाठी हत्तीची पूजा करून गाणी म्हणत हा उत्सव साजरा करतात. आपल्या शाळेत देखील आज सर्व मुलांनी फेर धरून गाणी म्हटली व छान नाचात आनंदाने सहभागी झाली. श्वेताताईंनी नवरात्रौत्सव व भोंडल्याची माहिती सांगितली. मुलांना भोंडल्याची खिरापत म्हणून भेळ देण्यात आली.

 


Looking for admission of your kid?

Ramabai Paranjape Balmandir is the right place to begin your child's education.