गणेशोत्सव
भाद्रपद महिन्यातील चतुर्थीला “गणेशचतुर्थी* असे म्हणतात. कोणत्याही शुभकार्याची सुरूवात गणेश पुजनाने केली जाते. गणपतीला दुर्वा, जास्वंदीचे फूल वाहतात. मोदकांचा नैवेद्य दाखवतात.
महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर गणेशोत्सव साजरा केला जातो. लोकमान्य टिळकांनी ब्रिटीश काळात सामाजिक एकी वाढवण्याकरता सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला, तेव्हापासून गणेशोत्सव हा घरगुती व सार्वजनिकरित्या मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो.
आपल्या शाळेतही गणेशाची बाल मुर्ती आणल्री जाते. आरास व सजावट केली जाते. रोज आरती केली जाते व मुलांना प्रसाद म्हणून वेगवेगळा खाऊ दिला जातो. शिक्षिकानी मुलांना पृथ्वी प्रदक्षिणा हे नाटक करून दाखवले, गणपतीची गोष्ट सांगितली. गणेशोत्सवाचा हा १० दिवस चालणारा सोहळा अनंतचतुर्टशीला गणपतीच्या मुर्तीचे विसर्जन करून संपतो.