Gallery 2022-2023
नागपंचमी हिंदू दिनदर्शिकेनुसार श्रावण महिन्यातील पहिला आणि महत्वाचा सण म्हणजे नागपंचमी होय. ह्या दिवशी नागाच्या प्रतिमेची किंवा मातीच्या नागदेवतेची पूजा केली जाते. श्रावण महिन्यातील पंचमीला नागपंचमी हा सण मोठ्या उत्साहात व आनंदात साजरा केला जातो. नागाच्या, सापाच्या अनेक जाती ,प्रजाती आहेत. काही नाग हे उपयोगी व काही अपायकारक असतात. नाग,साप शेतातील माती भुसभुशीत करतात, तसेच नाग शेतातील उंदीर व घुशी खातात त्यामुळे पिकाचे संरक्षण होते म्हणून नागाला शेतकऱ्याचा मित्र म्हणतात. म्हणूनच नागपंचमीच्या दिवशी नागांची सुरक्षा करण्याचा संकल्प केला जातो. शेतकरी नागाची व नागाच्या पिल्लांची पाटावर मनोभावे पूजा करून प्रार्थना करतात तसेच त्याबरोबर शेतीच्या अवजारांची पूजा करतात. आपल्या शाळेत देखील नागपंचमी हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. आज आपल्या शाळेच्या उपमुख्याध्यापिका ,शामलीताईंनी गंध फुले वाहून नागाची पूजा केली व सर्व मुलांनी श्लोक ,आरती ,गाणे म्हणून नागाला वंदन केले.
हिंदू दिनदर्शिकेनुसार श्रावण महिन्यातील पहिला आणि महत्वाचा सण म्हणजे नागपंचमी होय. ह्या दिवशी नागाच्या प्रतिमेची किंवा मातीच्या नागदेवतेची पूजा केली जाते. श्रावण महिन्यातील पंचमीला नागपंचमी हा सण मोठ्या उत्साहात व आनंदात साजरा केला जातो. नागाच्या, सापाच्या अनेक जाती ,प्रजाती आहेत. काही नाग हे उपयोगी व काही अपायकारक असतात. नाग,साप शेतातील माती भुसभुशीत करतात, तसेच नाग शेतातील उंदीर व घुशी खातात त्यामुळे पिकाचे संरक्षण होते म्हणून नागाला शेतकऱ्याचा मित्र म्हणतात. म्हणूनच नागपंचमीच्या दिवशी नागांची सुरक्षा करण्याचा संकल्प केला जातो. शेतकरी नागाची व नागाच्या पिल्लांची पाटावर मनोभावे पूजा करून प्रार्थना करतात तसेच त्याबरोबर शेतीच्या अवजारांची पूजा करतात. आपल्या शाळेत देखील नागपंचमी हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. आज आपल्या शाळेच्या उपमुख्याध्यापिका ,शामलीताईंनी गंध फुले वाहून नागाची पूजा केली व सर्व मुलांनी श्लोक ,आरती ,गाणे म्हणून नागाला वंदन केले.
Ramabai Paranjape Balmandir is the right place to begin your child's education.