शांतीचा पाठ
श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी शंकराची पुजा करतात व उपवास केला जातो.शंकराला शांतता खूप आवडते .आवाज,गोंगाट कर्कश नाद आवडत नाहीं.शांत बसून डोळे बंद करून ॐ नमः शिवाय असे म्हटले की ते शंकराला खूप आवडते.म्हणून सोमवारी आपल्या बालमंदिरात शांतीचा पाठ दाखवला जातो.
आजच्या धावपळीच्या जीवनात आपण सभोवतालचे ऐकू येणारे आवाज उदा .चिमण्यांची चिवचिव,घंटा ,झांज ,बांगड्यांचा आवाज हे आवाज शांत बसलो तर ऐकू शकतो.म्हणून दरवर्षी प्रमाणे आपल्या शाळेत यावर्षीही शांतीचा पाठ श्रावणी सोमवारी दाखविण्यात आला.सर्व मुले ताईंबरोबर शांत बसली होती सर्व ताई हळू आवाजात मुलांशी बोलत होत्या त्यानंतर मुलांनी प्रथम शांत बसून ॐ नमः शिवाय म्हटले .त्यानंतर अमिताताईंनी व कल्याणी ताईंनी मुलांना डोळे बंद करायला सांगून खंजिरी,झांज,घुंगरू,असे विविध आवाज ऐकवले.अशाप्रकारे मुलांनी शांत बसल्यामुळे आवाज ओळखले .शांतीच्या पाठाला सर्व ताईंनी पांढऱ्या रंगाचे कपडे घातले होते कारण पांढरा रंग हा शांतता दर्शवितो..शांतीच्या पाठामुळे मुलांना हळु आवाजात बोलण्याची सवय लागेल व ध्वनी प्रदूषणाला आळा बसेल.धन्यवाद!!