Top

Gallery 2022-2023

Nisargpooja

निसर्गपूजा

मराठी महिन्यातील ज्येष्ठ,आषाढ,श्रावण ,भाद्रपद हे पावसाचे महिने आहेत.पावसाची सगळे जण वाट पाहत असतात.देवाने ही सॄष्टी निर्माण केली व आपल्या सभोवताली आकाश ,सूर्य ,डोंगर,पाणी,नद्या,प्राणी,पक्षी,झाडे,वेली,,हवा,ह्यांना निर्माण केले.ह्यालाच म्हणतात" निसर्ग" हा निसर्ग म्हणजेच देवाने दिलेली देणगी आहे.निसर्ग आपआपली नेमून दिलेली कामे नियमितपणे करीत असतो.श्रावण महिन्यात पावसाच्या सरी बरसतात ,धरणी न्हाऊन निघालेली असते .झाडे- वेली,शेते हिरवीगार होतात .नद्या दुथडी भरून वाहू लागतात. पावसाने डोंगर , पर्वतरांगा भिजून निघतात.झाडे ,वेली फळाफुलांनी बहरलेली असतात.मातीचा सुगंध सगळीकडे दरवळतो .श्रावण महिना हा. सणांचा राजा आहे . आपण श्रावण महिन्यात खूप सण साजरे करतो.म्हणूनच ह्या निसर्गाची पूजा श्रावण महिन्यात केली जाते.निसर्गाने च आपल्याला सारे काही भरभरून दिले आहे अन्न,वस्त्र,पाने ,फुले ,फळे ,हवा ,पाणी , प्रकाश,नाद ह्या निसर्गानेच दिले आहे .म्हणूनच दर वर्षी आपल्या शाळेत श्रावण महिन्यात शुक्रवारी निसर्गपूजा केली जाते .निसर्गातील सगळ्या गोष्टी आपण जवळ आणू शकत नाही पण त्यांचे प्रतिक म्हणून पुजा केली जाते.आज आपल्या शाळेत निसर्गपूजा मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली.कल्याणीताईंनी मुलांना निसर्गपुजेचे महत्व सांगितले.त्यानंतर सॄष्टी निर्माण गणपतीबाप्पाने केली , ,कुठल्याही शुभकार्याची सुरुवात ही गणपतीच्या पुजेने होते.म्हणून आपल्या शाळेत मुख्याध्यापिका पुर्णिमाताईंनी गणपतीची गंध अक्षता,दुर्वा फुले वाहून पूजा केली व नैवेद्य दाखवून वक्रतुंड महाकाय........हा श्लोक म्हणून नमस्कार केला.त्यानंतर गणपतीची पूजा झाल्यावर सर्व जगाला उजळून टाकणारा सूर्य ☀️ अविरतपणे काम करीत असतो . आपल्याला प्रकाश देतो .त्याचे प्रतिक म्हणून समईची पूजा केली व गायत्री मंत्र म्हणून नमस्कार केला.त्यानंतर 🔔नाद आपल्याला सभोवताली पक्ष्यांचे झाडांचे,पाण्याचे आवाज ऐकू येतात.आवाजालाच म्हणतात "नाद" ह्या नादाचे प्रतिक म्हणून घंटेची पूजा करून प्रार्थना केली आणि आगमनार्थ तू देवानां....हा श्लोक म्हणून नमस्कार केला.

पाणी हे जीवन आहे .पाण्याशिवाय आपण जगूच शकत नाही.म्हणून पाण्याने भरलेल्या कलशाची पूजा करून प्रार्थना केली आणि गंगेच यमुनेचैव....हा श्लोक म्हटला. 🌳🌲झाडे आपल्याला अन्न, फळे ,फुले🌺🌹🌻 वस्त्र,सावली ,देतात.सर्वांना जीवनावश्यक असणारा प्राणवायू हा झाडांपासून मिळतो .म्हणून कुंडीत असलेल्या झाडाची पुजा केली व हात जोडून सदा सर्वदा....हा श्लोक म्हणून प्रार्थना केली. आज निसर्गाची पूजा म्हणजेच गणपतीची,समईची,घंटेची,कलशाची,झाडाची पूजा केली . अशाप्रकारे निसर्गाने दिलेल्या ह्या देणगीची आपण जपणूक करूया आणि रक्षण करूया .....

आज निसर्गाची पूजा करून मुलांबरोबर आरती म्हटली .
बागेत रंगांचा उत्सव झाला...
आनंदाचा राजा श्रावण आला..


Looking for admission of your kid?

Ramabai Paranjape Balmandir is the right place to begin your child's education.