Gallery 2022-2023
स्वातंत्र्यदिन --- २०२२ आपण दरवर्षी १५ ऑगस्ट रोजी आपला स्वातंत्र्यदिन साजरा करतो. हा दिवस प्रत्येक भारतीयाच्या आयुष्यातील ऐतिहासिक व संस्मरणीय दिवस आहे. हे वर्ष भारताच्या स्वातंत्र्याचे ७५ वे वर्ष आहे. आपण हे वर्ष “आझादी का अमृतमहोत्सव म्हणून साजरे करणार आहोत. या अमृतमहोत्सवाचा एक भाग म्हणून आपल्या पंतप्रधानांनी "हर घर तिरंगा' मोहीम आयोजित केली आहे. देशातील प्रत्येक घरात शाळा, कॉलेज, कार्यालयात १३ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट या काळात भारतीय तिरंगा लावण्याचे आवाहन केले आहे. भारताचे राष्ट्रपती स्वातंत्र्याच्या पूर्वसंधेला राष्ट्राला संबोधित करतात. आपले पंतप्रधान या दिवशी लाल किल्यावर भारताचा तिरंगा फडकवितात व राष्ट्राला उद्देशून भाषण करतात. आपल्या शाळेतही स्वातंत्र्यदिन साजरा केला गेला. आपला राष्ट्रध्वज आपल्या आदरणीय मुख्याध्यापिका श्रीमती पूर्णिमाताई शास्त्री व उपमुख्याध्यापिका शामलीताई मोरे तसेच अंधेरी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती मृदुलाताई फडके व उपमुख्याध्यापिका श्रीमती अनुश्रीताई ओर्पे यांनी ध्वजारोहण केले. मुलांना स्वातंत्र्यदिनाची माहिती दिली गेली व त्या दिवसाचे महत्त्व समजावून सांगितले गेले. मुलांनी राष्ट्रगीत व देशभक्तीपर गीते गाऊन राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली.
आपण दरवर्षी १५ ऑगस्ट रोजी आपला स्वातंत्र्यदिन साजरा करतो. हा दिवस प्रत्येक भारतीयाच्या आयुष्यातील ऐतिहासिक व संस्मरणीय दिवस आहे. हे वर्ष भारताच्या स्वातंत्र्याचे ७५ वे वर्ष आहे. आपण हे वर्ष “आझादी का अमृतमहोत्सव म्हणून साजरे करणार आहोत. या अमृतमहोत्सवाचा एक भाग म्हणून आपल्या पंतप्रधानांनी "हर घर तिरंगा' मोहीम आयोजित केली आहे. देशातील प्रत्येक घरात शाळा, कॉलेज, कार्यालयात १३ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट या काळात भारतीय तिरंगा लावण्याचे आवाहन केले आहे. भारताचे राष्ट्रपती स्वातंत्र्याच्या पूर्वसंधेला राष्ट्राला संबोधित करतात. आपले पंतप्रधान या दिवशी लाल किल्यावर भारताचा तिरंगा फडकवितात व राष्ट्राला उद्देशून भाषण करतात. आपल्या शाळेतही स्वातंत्र्यदिन साजरा केला गेला. आपला राष्ट्रध्वज आपल्या आदरणीय मुख्याध्यापिका श्रीमती पूर्णिमाताई शास्त्री व उपमुख्याध्यापिका शामलीताई मोरे तसेच अंधेरी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती मृदुलाताई फडके व उपमुख्याध्यापिका श्रीमती अनुश्रीताई ओर्पे यांनी ध्वजारोहण केले. मुलांना स्वातंत्र्यदिनाची माहिती दिली गेली व त्या दिवसाचे महत्त्व समजावून सांगितले गेले. मुलांनी राष्ट्रगीत व देशभक्तीपर गीते गाऊन राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली.
Ramabai Paranjape Balmandir is the right place to begin your child's education.