दीपपूजा (आषाढ अमावस्या)
आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवसाला "आषाढ अमावास्या” असे म्हणतात. या दिवशी घरातील दिवे म्हणजे समई, निरांजन इ. घासून स्वच्छ करून लख्ख करून पाटावर मांडून समोर रांगोळी काढून, त्यांची पूजा केली जाते. घरातील रोगराई, अज्ञान, इडापीडा दूर होवून ज्ञानाचा प्रकाश पसरावा या करता दीपपूजन केले जाते. आपल्या शाळेतही मुलांना दिव्यांचे वेगवेगळे प्रकार दाखवून त्यांचे महत्व सांगितले गेले. व त्यांची पूजा केली गेली. मोठ्या शिशूच्या मुलांनी दिव्याचे नाटक सादर केले. छोट्या शिशूच्या मुलींनी दिव्यांचा नाच केला. मुलांना साखर फुटाण्याचा खाऊ प्रसाद म्हणून दिला गेला.