आषाढ महिन्यातील शुदध पौर्णिमेला गुरू पौर्णिमा किंवा व्यास पौर्णिमा असे म्हणतात. गुरू म्हणजे मार्गदर्शक व पौर्णिमा म्हणजे प्रकाश. गुरूंकडून मिळालेल्या ज्ञानामुळे जीवन प्रकाशमय होते, या दिवशी शिष्य गुरूंविषयी कृतज्ञता व्यक्त करतात व गुरूंना गुरूदक्षिणा देतात.
मॅडम मॅांटेसरी या बालवाडी शिक्षणाच्या जनक मानल्या जातात. त्यांच्या शिक्षण पद्धतीला अनुसरून ताराबाई मोडक यांनी गिजूभाई बधेका यांच्या मदतीने भारतभर बालवाड्या सुरू केल्या. आपल्या शाळेच्या संस्थापक सदस्या श्रीमती राधाबाई चित्तार, श्रीमती शारदाबाई चितळे,श्रीमती शशिकलाबाई कासरगोड यांनी ताराबाई मोडक यांच्या पद्धती प्रमाणे आपली शाळा सुरू केली.
आपल्या शाळेतही गुरूपौर्णिमा उत्साहाने साजरी केली गेली. शाळेच्या मुख्याध्यापिका,उपमुख्याध्यापिका या गुरूंची पूजा करून त्यांना वंदन करून त्यांचा आशीर्वाद घेतला गेला. मुलांनी श्लोक म्हणून शिक्षकांसमोर नतमस्तक होऊन त्यांचा आशीर्वाद घेऊन हा दिवस साजरा केला.