Gallery 2022-2023
मराठी दिनदर्शिकेप्रमाणे आषाढ महिन्यात येणाऱ्या शुद्ध एकादशीला "आषाढी एकादशी" म्हणतात. या दिवशी विठोबा-रखुमाईची महापूजा केली जाते. आषाढी एकादशीला टाळ मृदुंगाच्या नादात वारकरी दिंडीचे आयोजन केले जाते. या दिवशी उपवास केला जातो. आपणही आपल्या शाळेत आषाढी एकादशीचा कार्यक्रम साजरा केला. शाळेतील ताई व मोठ्या शिशूची काही मुलं वारकरी होऊन दिंडीत सहभागी झाली होती. ही दिंडी आनंदाने व उत्साहाने साजरी केली गेली. या दिवशी सर्व मुलांना साबूदाण्याची खिचडी खाऊ म्हणून दिली गेली.
Ramabai Paranjape Balmandir is the right place to begin your child's education.